सर्वसामान्य नियम व अटी


  • १) कोणत्याही तारखेपासून सभासद होता येईल. वर्गणी संपूर्ण महिन्याची घेतली जाईल.
  • २) वर्गणी दरमहा आगाऊ १० तारखेचे आत दिली पाहिजे.
  • ३) पुस्तके नेल्यापासून १५ दिवसात पुस्तक परत केले पाहिजे. पुन्हा तेच पुस्तक हवे असल्यास री-इश्यु करून घ्यावे. मात्र पुन्हा नोंद न केल्यास व असे पुस्तक १५ दिवसानंतर परत आल्यास पुढील प्रत्येक दिवसाला एक रुपया विलंब शुल्क आकारण्यात येईल. विलंब शुल्क न दिल्यास पुढील पुस्तक मिळणार नाही.
  • ४) अंक विभागाच्या सभासदांना आपल्या खात्यावर एक अंक मिळू शकेल. तीन दिवस अंक ठेवता येईल. अंक चौथ्या दिवशी परत करावा. अंक चौथ्या दिवशी परत न केल्यास पुढील प्रत्येक दिवसाला एक रुपया शुल्क आकारले जाईल.
  • ५) पुस्तक, मासिक किंवा वर्तमानपत्र अगर कोणतेही वाचन साहित्य हरविल्यास अगर खराब केल्यास त्याची इतर सर्व खर्चासह किंमत भरून द्यावी लागेल.
  • ६) दररोज फक्त एकदाच पुस्तक किंवा अंक बदलता येईल.
  • ७) एखाद्या पुस्तकाला जास्त मागणी असल्यास, ग्रंथालयाने त्या पुस्तकाकरीता (नंबर) क्लेम सुरु केला असल्यास व आपणास ते पुस्तक हवे असल्यास , आपण क्लेम लावावा. आपला नंबर येताच पुस्तक उपलब्ध करून दिले जाईल.
  • ८) तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस वर्गणी येणे राहिल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता पुस्तक देणे बंद केले जाईल.
  • ९) आपल्या खात्यावर दुसऱ्या इसमास पुस्तक देण्याचे असल्यास सभासदाने लेखी चिट्ठी द्वारे कळविले पाहिजे.
  • १०) खाते बंद करताना अनामत रक्कम परत करण्यात येईल. मात्र महिना अखेरीस अंक, पुस्तके वगैरे जमा केलेली पाहिजे. नवीन महिन्याच्या ५ तारखेनंतर पुस्तके जमा केल्यास आणि या तारखेनंतर खाते बंद करायचे असल्यास चालू महिन्याची वर्गणी द्यावी लागेल. खाते बंद करण्याचा अर्ज अनामत भरल्याच्या पावतीसह द्यावा.
  • ११) कोश, संदर्भ या इंग्रजी/मराठी यादीतील कोणताही ग्रंथ खात्यावर मिळणार नाही. मात्र तो सभासदांना ग्रंथालयात पाहता येईल.
  • १२) खात्यावर असलेली पुस्तके, वर्गणी जमा करून खाते ३ महिन्यापर्यंत स्थगित ठेवता येईल.स्थगित कालावधीत वर्गणी आकारली जाणार नाही. तीन महिन्यानंतर खाते चालू न केल्यास ते न कळविता बंद केले जाईल.
  • १३) प्रत्येक खात्यावर एकाच दिवाळी अंक दिला जाईल. अंक नेल्यापासून तो ३ दिवस ठेवता येईल. अंक चौथ्या दिवशी परत न केल्यास पुढील प्रत्येक दिवसाला १ रुपया विलंब शुल्क आकारले जाईल.
  • १४) अर्जात दिलेला पत्ता बदलल्यास ताबडतोब कळवावे.
  • १५) वर्गणी दिल्याची पावती घ्यावी व ती राखून ठेवावी.
  • १६) बालविभागाच्या सभासदांसाठी पालकांच्या संमतीची जरुरी आहे.
  • १७) खालील दिलेल्या कोष्टकाप्रमाणे पुस्तके मिळतील.
  • १८) पुस्तक देवघेव पद्धतीची सुरुवातीलाच माहिती करून घ्यावी.
  • १९) काही माहिती हवी असल्यास दिली जाईल. माहितीसाठी ग्रंथालयीन वेळात ग्रंथपाल किंवा कार्यवाह यांना भेटावे. सूचना करावयाची असल्यास लेखी करावी.
  • २०) आपला पत्ता बरोबर असल्याबाबत या अर्जासोबत रेशनकार्ड, घराची पावती अगर अन्य दस्तऐवजाची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी लागेल.

अनामत, मासिक वर्गणी आणि पुस्तके मिळण्याचे प्रमाण


वर्ग प्रवेश शुल्क मासिक वर्गणी अनामत एकावेळी पुस्तके मुदत
१ ला १००.०० १५०.०० १०००.०० ४५ दिवस
२ रा १००.०० ११०.०० ७००.०० ४0 दिवस
३ रा १००.०० १००.०० ५००.०० ३० दिवस
४ था १००.०० ५०.०० २००.०० १५ दिवस
बालविभाग सभासद - २५.०० ५०.०० ३० दिवस
अंक विभाग ५०.०० ५०.०० १००.०० -
तहहयात सभासद वर्गणी १०,०००.०० ३० दिवस