उपक्रम

       रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय हे फक्त रत्नागिरीतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक केंद्र आहे. वाचनालय गेली 189 वर्षे वाचकांची वाचन तृष्णा भागवीण्याचे कार्य करत आले आहे. तसेच वाचनालयाचे उद्दिष्ट व सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरीचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत आले आहे.

       यासाठी वर्षातून किमान 14 ते 15 सांस्कृतिक कार्यकम वाचनालयात घेतले जातात. यामध्ये सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या तसेच स्वतःचा विशिष्ठ ठसा उमटवलेल्या व्यक्तिमत्वांच्या व्याख्यानांचे, मुलाखतीचे आयोजन वाचनालयात केले जाते. त्याच बरोबर समाजात, आर्थिक जगतात वेळोवेळी घडणाऱ्या ठळक घडामोडींवर प्रकाश झोत टाकणारे माहितीपर कार्यक्रम , वैद्यकीय-शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, त्याचबरोबर संगीत मैफल, विविध बाल शिबीर, ग्रंथ प्रदर्शने यांचे आयोजन केले जाते.

       या कार्यक्रमांना वाचनालयाला सुजाण नागरिकांचा नेहमीच उदंड प्रतिसाद लाभतो. वाचनालय बालवाचक तसेच गुणवंत विध्यार्थी याच्यासाठीही विविध उपक्रम राबवत असतो. त्यालाही मुलांकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो.

ग्रंथसाखळी योजना

गाव तेथे ग्रंथालय या उक्तीला सहाय्यभुत ठरणारी अशी ग्रथसाखळी योजना आमचे वाचनालय प्रभावीपणे राबवत असते. यात गावातील व शाळांमधील ग्रंथालयांना वाचनालयाचे सभासद करुन घेवून पुस्तके वाचनासाठी पुरविली जातात.

सभागृह

वाचनालयाचे स्वत:च्या इमारतीत भव्य असे ४००० स्क्वेअर फुटाचे प्रशस्त सभागृह आहे. या सभागृहात अनेक विविधांगी कार्यक्रम घेतले जातात.

सांस्कृतिक कार्यक्रम

वाचनालयातर्फे सातत्याने दर्जेदार, सहित्यिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात ग्रंथप्रदर्शन, कविसंमेलन, संगीत मैफल, सहित्यीकांशी गप्पाटप्पा, चर्चासत्र इत्यादी अनेक विविधांगी कार्यक्रम घेतले जातात.

व्याख्यानमाला

ग्रंथालायामार्फत विविध विषयावर तज्ञांची व्याख्याने ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित केली जातात, हि व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी उपयुक्त ठरतात. शहरातील नागरिक मोठ्या संख्येने अशा व्याख्यानांचा लाभ घेतात.