संस्थेबद्दल
विद्यमान ग्रंथालय पूर्वी सन १८२८ मध्ये कोकणबुक सोसायटी या नावाने लहानशा प्रमाणात सुरु झाले. महाराष्ट्रातील मोजक्याच जुन्या ग्रंथालयांपैकी हे एक ग्रंथालय आहे. किंबहूना ते महाराष्ट्रातील सर्वात जुने आहे, सन १८५० मध्ये वाचनालयाचे नेटिव्ह जनरल लायब्ररी असे नामकरण व रुपांतर झाले आणि १८८८ पर्यंत ते त्याच नावाने चालू होते. याच दरम्यान ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाचनालयाचे सभासद व्हायचे होते. परंतु नेटिव्ह हा शब्द असल्याने त्यांना सभासद होण्यास अडचण निर्माण झाली. त्यावेळी नेटिव्ह हा शब्द वगळून फक्त जनरल लायब्ररी असे नामकरण झाले.ब्रिटिश आधिकारी सभासद झाले. त्यानंतर स्वा.सावरकरांच्या स्थानबद्धतेच्या कालखंडात असताना त्यांनी निर्भेळ असे नगर वाचनालय नामकरण केले पुढे १९५१ साली रत्नगिरी (जिल्हा) नगर वाचनालय असे रुपांतरीत करुन तेच नाव आजही रुढ आहे.
संस्थाध्यक्ष संदेश >> रजिस्ट्रेशनसार्वजनिक विश्वस्त व्यवस्था आधिनियम १९५० अन्वये नोंदणी क्रमांक RTN-E-7 (रत्नगिरी) दि.१३.११.१९५२
सुसज्ज मुक्त वाचन विभागवाचनालयात सभासद, वाचक यांचेसाठी सुसज्ज असा मुक्त वाचन विभाग केलेला आहे. वाचन विभागात निरनिराळी मसिके, पक्षिके, दैनिके उपलब्ध करुन दिलेली आहेत. याचा लाभ दिवसभरात जवळजवळ ४०० सभासद, वाचक घेत असतात. या विभागाचा फायदा विद्यार्थीवर्गाला आपल्या अध्यापनासाठाही होत आहे.
सभागृहवाचनालयाचे स्वत:च्या इमारतीत भव्य असे ४००० स्क्वेअर फुटाचे प्रशस्त सभागृह आहे. या सभागृहात अनेक विविधांगी कार्यक्रम घेतले जातात.
ग्रंथसाखळी योजनागाव तेथे ग्रंथालय या उक्तीला सहाय्यभुत ठरणारी अशी ग्रथसाखळी योजना आमचे वाचनालय प्रभावीपणे राबवत असते. यात गावातील व शाळांमधील ग्रंथालयांना वाचनालयाचे सभासद करुन घेवून पुस्तके वाचनासाठी पुरविली जातात व ठरावीक कालावधीने ती पुस्तके त्यांना बदलून दिली जातात.
सांस्कृतिक कार्यक्रमवाचनालयातर्फे सातत्याने दर्जेदार, सहित्यिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात ग्रंथप्रदर्शन, व्याख्यानमाला, कविसंमेलन, संगीत मैफल, सहित्यीकांशी गप्पाटप्पा, चर्चासत्र इत्यादी अनेक विविधांगी कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांना रसिक रत्नगिरीकरांचा उदंड प्रतिसाद लाभतो.
वाचनालयात सभासद, वाचक यांचेसाठी सुसज्ज असा मुक्त वाचन विभाग केलेला आहे. वाचन विभागात निरनिराळी मसिके, पक्षिके, दैनिके उपलब्ध करुन दिलेली आहेत. याचा लाभ दिवसभरात जवळजवळ ४०० सभासद, वाचक घेत असतात. या विभागाचा फायदा विद्यार्थीवर्गाला आपल्या अध्यापनासाठाही होत आहे.
गाव तेथे ग्रंथालय या उक्तीला सहाय्यभुत ठरणारी अशी ग्रथसाखळी योजना आमचे वाचनालय प्रभावीपणे राबवत असते. वाचानालायामध्ये विविध विषयांवरची ८३००० पुस्तके उपलब्ध आहेत, व या ग्रंथासंपदेमध्ये वेळोवेळी वाढ होत असते. विविध गावातील ग्रंथालयांना पुस्तके वाचनासाठी पुरविली जातात
वाचनालयातर्फे सातत्याने दर्जेदार, सहित्यिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात ग्रंथप्रदर्शन, व्याख्यानमाला, कविसंमेलन, संगीत मैफल, सहित्यीकांशी गप्पाटप्पा, चर्चासत्र इत्यादी अनेक विविधांगी कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांना रसिक रत्नगिरीकरांचा उदंड प्रतिसाद लाभतो.