संस्थाध्यक्ष संदेश

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या संकेतस्थळावर आपल मनःपूर्वक स्वागत !

वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या सेवेत रुजू होताना खूप आनंद होत आहे. वाचनालयाचे नवीन संकेतस्थळ तयार करून वाचनालयाला अंतरराष्ट्रीय सत्यावर नेण्यासाठी आणि वाचनालयाची ग्रंथसंपदा आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू होते व त्यादृष्टीने वाचनालयाने ठोस पावले उचलण्यास सुरुवातही केली होती. या प्रयत्नांना आपल्या शुभेच्छांची जोड मिळाली आणि आज आम्ही या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या सेवेत रुजू होत आहोत.


गेली १८७ वर्षे वाचकांची वाचानतृष्णा भागवण्याचे काम हे वाचनमंदिर करत आले आहे. त्यासाठी सभासदांच्या मागणीचा विचार करून ग्रंथ खरेदी केली जाते. त्याचबरोबर नवनवीन पुस्तके प्रकाशित झाल्यानंतर ती त्वरेने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही वेळोवेळी करीत असतो.


या वाचनालयाने आजतागायत स्वामी स्वरूपानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या थोर विभूतींचा सहवास अनुभवला आहे. ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी ते जिल्हा नगर वाचनालय या प्रदीर्घ प्रवासात रत्नागिरीच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक अभिसरणाशी एकरूप झालेले हे ग्रंथमंदिर रात्नागीरीतीलच नव्हे तर अखंड भारातभूमीतील वाचकांचे आकर्षण केंद्र राहिले आहे.


आज या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण एकमेकांपर्यंत सहजतेने पोहोचू शकत आहोत. वेळोवेळी वाचनालयात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे आता आम्हाला सोपे झाले आहे. तसेच आपल्याला आमच्या संकेतस्थळाद्वारे आमच्याशी संपर्क साधणे सहज शक्य झाले आहे. “प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे” या रंगनाथान यांच्या व्दितीय सूत्राप्रमाणे वाचनालयातील ग्रंथसंपदा आपल्यापर्यंत पोचवण्याचे आमचे प्रयत्न होते, ते आम्ही या संकेतस्थळाच्या माध्यमातून साध्य केले. तसेच “प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे” ह्या तृतीय सूत्राप्रमाणे वाचनालयाचे सभासद होण्यासाठी आपण आमच्या संकेतस्थळावरून फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता. आणि या सेवेचा आपण निश्चित लाभ घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो.


आपला स्नेहांकित, अॅड. दीपक पटवर्धन, अध्यक्ष