आमच्याबद्दल
विद्यमान ग्रंथालय पूर्वी सन १८२८ मध्ये कोकणबुक सोसायटी या नावाने लहानशा प्रमाणात सुरु झाले. महाराष्ट्रातील मोजक्याच जुन्या ग्रंथालयांपैकी हे एक ग्रंथालय आहे. किंबहूना ते महाराष्ट्रातील सर्वात जुने आहे, सन १८५० मध्ये वाचनालयाचे नेटिव्ह जनरल लायब्ररी असे नामकरण व रुपांतर झाले आणि १८८८ पर्यंत ते त्याच नावाने चालू होते. याच दरम्यान ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाचनालयाचे सभासद व्हायचे होते. परंतु नेटिव्ह हा शब्द असल्याने त्यांना सभासद होण्यास अडचण निर्माण झाली. त्यावेळी नेटिव्ह हा शब्द वगळून फक्त जनरल लायब्ररी असे नामकरण झाले.ब्रिटिश आधिकारी सभासद झाले. त्यानंतर स्वा.सावरकरांच्या स्थानबद्धतेच्या कालखंडात असताना त्यांनी निर्भेळ असे नगर वाचनालय नामकरण केले पुढे १९५१ साली रत्नगिरी (जिल्हा) नगर वाचनालय असे रुपांतरीत करुन तेच नाव आजही रुढ आहे.
१८२८
दि.१३.११.१९५२
RTN E/13
गौरवशाली परंपरा
वाचनालयात सभासद व वाचकांसाठी सुसज्ज असा मुक्त वाचन विभाग उपलब्ध आहे, जिथे विविध मासिके, पाक्षिके आणि दैनिके उपलब्ध करून दिली जातात. दररोज सुमारे ४०० वाचक याचा लाभ घेतात.
वाचनालयाच्या स्वतःच्या इमारतीत भव्य आणि ४००० स्क्वेअर फुटांचे प्रशस्त सभागृह आहे. या सभागृहात विविध सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जातात
वाचनालयातर्फे सातत्याने दर्जेदार साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात व्याख्यानमाला, कविसंमेलन, ग्रंथप्रदर्शन व चर्चासत्रे यांना रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळतो.
वाचनालयामध्ये विविध विषयांवरची १ लाख ९५ हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. तसेच 'गाव तेथे ग्रंथालय' या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पुस्तके पुरवली जातात.
आमच्या कार्यकारी मंडळाचे सन्माननीय सदस्य