रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय हे महाराष्ट्रतील सर्वात जुने १८७ वर्षाची परंपरा असलेले वाचनालय आहे. स्थापनेपासून ब्रिटीश लायब्ररी असे नामकरण असलेल्या या वाचनालयाचे, रत्नागिरीतील आपल्या स्थानबध्दतेच्या कालावधीत, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय असे नामकरण केले. पावसचे प. पू. स्वामी स्वरूपानंदाचे सान्निध्य सुद्धाया वाचनालयाला लाभले आहे. अनेक ऋषीतुल्य व्यक्तिमत्वांचा सहवास लाभलेल्या या वाचनालयामध्ये आज ८८००० इतकी ग्रंथसंपदा आहे. ग्रंथसंपदे बरोबर रत्नागिरीमध्ये सांस्कृतीक, साहित्यक संपदा वृध्दिंगत व्हावी या हेतूने रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सातत्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते. यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्यवीरांची कर्मभूमी! हे औचित्य साधून "२८वे स्वातंत्रवीर सावरकर साहित्य संमेलनाचे" आयोजन आम्ही करीत आहोत. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयच्या भव्य सभागृहात २९ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीत हे संमेलन होणार आहे. मान्यवर व्यक्तींचे परिसंवाद, विविध चर्चासत्रे, मुलाखती, व्याख्याने, भाषणे, सांस्कृतीक कार्यक्रम असे या संमेलनाचे स्वरूप रहाणार आहे.


मा.खास. विनायकजी राऊत (रत्नागिरी-सिंधूदुर्ग) संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे पद भूषवित आहेत. राष्ट्रीय विमुक्त जाती, भटक्या आणि अर्ध भटक्या जाती जमातीच्या आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. भिकुजी (दादा) इदाते यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून संमेलनाचे उदघाटन दि. २९ जानेवारी २०१६ रोजी सायंकाळी ३.०० वाजता मा. ना. नितीनजी गडकरी ( केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज परिवहन मंत्री, भारत सरकार) यांचे हस्ते होणार आहे.


डॉ. विनय सहस्रबुद्धे, अॅड. किशोर जावळे, डॉ. श्रीरंग गोडबोले, सौ. धनश्री लेले, डॉ. अशोक मोडक, श्री. व्हि. एम. पाटील( निवृत्त लेफ्ट. जन.), प्रा. सोनवडकर, प्रा. दत्ता नाईक, श्री. दुर्गेश परुळकर, श्री. समीर दरेकर, श्री. अश्विनी मयेकर असे दिग्गज वक्ते उपस्थित रहाणार आहेत. तसेच नेते मा. प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री उपस्थित रहाणार आहेत.

वेळकार्यक्रमवक्ते
शुक्रवार दि. २९ जानेवारी २०१६
सकाळी ०८.३० - ९.३० ग्रंथदिंडी पतित पावन मंदिर ते
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय
सायं ०३.०० - ०५.०० उद्घाटन समारंभ प्रमुख अतिथी : मा.ना. नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री)
स्वागताध्यक्ष : मा.खा. विनायक राऊत
अध्यक्ष : मा. भिकूजी (दादा) इदाते
०६.१५ - ०८.३० सुमधुर गीतांचा कार्यक्रम- स्वरलहरी सादरकर्ते : श्री. रवींद्र साठे आणि सहकारी
शनिवार दि. ३० जानेवारी २०१६
सकाळी ९.३० - ११.३० परिसंवाद - 1
विषय : सावरकरांच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र
अध्यक्ष : डॉ. विनय सहस्रबुद्धे
सहभागी वक्ते
०१ अॅड. किशोर जावळे
०२. डॉ. श्रीरंग गोडबोले
दुपारी ११.४५ - ०१.००सावरकरांचे साहित्य विश्वसौ. धनश्री लेले- मुंबई
०३.३० - ०५.३०परिसंवाद - २
विषय : आंतरराष्ट्रीय राजकारण
आणि सावरकरांचे द्रष्टेपण
अध्यक्ष : डॉ. अशोक मोडक
सहभागी वक्ते
०१. व्ही.एम.पाटील( निवृत्त लेफ्ट.जन.)
०२. प्रा. सोनवडकर अंबाजोगाई
रात्री ९.०० - ११.०० सांस्कृतिक कार्यक्रम - सावरकर दर्शन प्रतिष्ठान निर्मित सावरकरांच्या तेजस्वी जीवनाचा संगीतमय प्रवास "अनादि मी .. . . अवध्य मी"
रविवार दि. ३१ जानेवारी २०१६
सकाळी ९.३० - ११.०० परिसंवाद - ३
विषय : भारतातील सामाजिक क्रांती
आणि सावरकरांचे योगदान
अध्यक्ष : प्रा. दत्ता नाईक
सहभागी वक्ते
०१. दुर्गेश परुळकर
०२. समीर दरेकर
०३.अश्विनी मयेकर
११.१५ - १२.१५भाषण विषय: सावरकर घराण्याची देशभक्ती वक्ते : डॉ. अशोक मोडक
दुपारी १२.३० - ०२.००समारोपमा. प्रकाश जावडेकर(केंद्रीय मंत्री)