Nagar Vachanalay Ratnagiri Public Library Ratnagiri District Library Ratnagiri

सुसज्ज आणि प्रशस्त वाचनकक्ष

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालायत सभासद व वाचकांसाठी सुसज्ज असा मुक्त वाचनकक्ष केलेला आहे. या वाचनकक्षात विविध विषयांवरील मासिके, पक्षिके, दैनिके उपलब्ध करून दिलेली आहेत. नैसर्गिक प्रकाशयोजना, खेळती हवा, तसेच शांत व प्रसन्न वातावरण यामुळे दररोज सुमारे 150 ते 200 वाचक या मुक्त वाचनकक्षाचा लाभ घेत असतात. तसेच, विद्यार्थीवर्गही आपल्या अध्यापनासाठी या वाचन कक्षाचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत असतो.

समृद्ध ग्रंथसंपदा

सन 1828 साली इंग्रजांच्या काळात स्थापन झालेल्या या वाचनालायत त्या काळातील इंग्रजी पुस्तकांचा संग्रह,अध्यात्मिक, धार्मिक ग्रंथ, याचबरोबर सामाजिक, राजकिय, वैज्ञानिक अशा अनेकविध विषयांवरील ग्रंथसंपदा, जना मनात विशिष्ट स्थान निर्माण केलेल्या लोकप्रिय साहित्यिकांचे वाचनसाहित्य यांनी समृद्ध असे हे वाचनालय आहे. आज रोजी वाचनालयाची ग्रंथ संपदा सुमारे 90000 असून ती 100000 करण्याचा वाचनालयाचा मानस आहे.

उपक्रम

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय हे फक्त रत्नागिरीतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक केंद्र आहे. वाचनालय गेली 189 वर्षे वाचकांची वाचन तृष्णा भागवीण्याचे कार्य करत आले आहे. तसेच वाचनालयाचे उद्दिष्ट व सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरीचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत आले आहे.

अध्यक्षीय संदेश

अॅड. दीपक पटवर्धन, अध्यक्ष

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या संकेतस्थळावर आपल मनःपूर्वक स्वागत !


वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या सेवेत रुजू होताना खूप आनंद होत आहे. वाचनालयाचे नवीन संकेतस्थळ तयार करून वाचनालयाला अंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आणि वाचनालयाची ग्रंथसंपदा आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू होते व त्यादृष्टीने वाचनालयाने ठोस पावले उचलण्यास सुरुवातही केली होती. या प्रयत्नांना आपल्या शुभेच्छांची जोड मिळाली आणि आज आम्ही या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या सेवेत रुजू होत आहोत.

पुढे वाचा...

मान्यवरांचे अभिप्राय

रत्नागिरी नगर वाचनालयात यापूर्वी बऱ्याच वेळा येऊन गेलो आहे. यंदा कार्यकारी मंडळाच्या सदस्यापैकी काही जणांना भेटण्याचा योग आला. वाचनालयाला आता स्वतःच्या अधिक मोठ्या इमारतीची आवश्यकता आहे. यासाठी प्रयत्नही चालू आहेत. नगर वाचनालयाला स्वतःच्या नव्या इमारतीत गेलेले पाहण्याचा योग लवकरच येवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

- पु. ल. देशपांडे जेष्ठ साहित्यिक (२८ एप्रि. १९५९)

कुठल्याही क्षेत्रातील सार्वजनिक कार्य हे समाजात एक घट्ट वीण बांधीत असते आचारांची, विचारांची, संस्कृतीची, साहित्याची. ही कार्यदिंडी अशीच या मार्गावरून पुढे जाऊदे मागे वळून पाहाल तेव्हा पूर्ण मार्ग याच आचाराविचारांनी सुशोभित झालेला असेल.

- अरुण नलावडे अभिनेते (२७ मार्च २००५)

बातम्या

📚----- सस्नेह निमंत्रण -----📚 रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाची १९० वर्षाकडे वाटचाल होत असतानाच,
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय संचालित
श्रीमान गंगाधरभाऊ पटवर्धन स्मृती ग्रंथालय
या नूतन शाखेचा शुभारंभ नारायण स्मृती, अमूल आईसक्रिम पार्लर जवळ, शेरे नाका, झाडगांव, रत्नागिरी येथे होत आहे.
मा. श्री. रवींद्र साठे, कार्यकारी संचालक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ठाणे यांच्या शुभहस्ते या शाखेचे उद्घाटन होत आहे.
कार्यक्रम स्थळ : माधवराव मुळ्ये भवन, शेरे नाका, झाडगाव, रत्नागिरी. सोम. दि. 11 डिसे. 2017 सायं 6.00 वा.
तरी या शुभप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आपला स्नेहांकित
अॅड. दीपक पटवर्धन
अध्यक्ष
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय रत्नागिरी